शहांच्या दौऱ्यातील नियमबाह्य वाहनांची जबाबदारी कोणाची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहांच्या दौऱ्यातील नियमबाह्य 
वाहनांची जबाबदारी कोणाची?
शहांच्या दौऱ्यातील नियमबाह्य वाहनांची जबाबदारी कोणाची?

शहांच्या दौऱ्यातील नियमबाह्य वाहनांची जबाबदारी कोणाची?

sakal_logo
By

प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसेच उपपंतप्रधानांना आवश्यकतेनुसार वाहने पुरविण्यात येतात, तर अन्य राज्याचे राज्यपाल वा मुख्यमंत्र्यांना दोन वाहने पुरवण्याचा नियम आहे. त्याशिवाय अन्य राज्यांतील उच्च पदाधिकाऱ्यांना राज्य अतिथींचा दर्जा देऊन त्यांना वाहनाची सुविधा पुरवण्याचे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो; मात्र गृहमंत्री अमित शहा यांच्याव्यतिरिक्त इतरांना राज्य अतिथींचा दर्जा नसतानाही पुरवण्यात आलेल्या वाहनांची सेवा नियमबाह्य असल्याचे उघड झाले आहे.
शहा यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात सुमारे ३० वाहनांपेक्षा अधिक वाहनांचा ताफा होता. त्यामध्ये शासकीय परिवहन सेवेतील राज्य अतिथींची १० पेक्षा अधिक वाहने असल्याचे पुरावे ‘सकाळ’च्या हाती लागले आहेत. शहा यांच्या ताफ्यात देण्यात आलेल्या वाहनांना राजशिष्टाचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगीच दिली नसल्याचे सांगत आता वरिष्ठांनी हात वर केले आहेत.
दौऱ्यात वापरण्यात आलेल्या शहा यांच्या वाहनांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनाला राजशिष्टाचार विभागाच्या वरिष्ठांची परवानगी नसल्याचे उघड झाले आहे. त्याशिवाय दौऱ्यापूर्वी वाहनांचे फिटनेस तपासून तसे प्रमाणपत्र दिले जाते. त्या प्रमाणपत्रांवरही वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज्य अतिथींच्या वाहनांचा सर्रास गैरवापर सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
------------
राजशिष्टाचार विभागाची चुप्पी
यासंदर्भात राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना वाहनांच्या नियमबाह्य वापराबद्दल विचारणा केली असता, त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. शिवाय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही चुप्पी साधली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95941 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..