सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायरस मिस्त्री यांच्या 
पार्थिवावर अंत्यसंस्कार
सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ ः मोटार अपघातात निधन झालेल्या उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज वरळी येथील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुजरातच्या उदवाडा येथून मुंबईकडे येताना रविवारी सायरस मिस्त्री यांच्या वाहनाला पालघर जिल्ह्यातील चारोटी पुलावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल यांचे निधन झाले. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव आज जे.जे. रुग्णालयातून वरळी स्मशानभूमीत आणण्यात आले. तेथे अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय आणि उद्योग वर्तुळातील अनेक मान्यवर, मिस्त्री यांचे नातलग तसेच शापूरजी पालनजी कंपनीतील अधिकारी व कर्मचारी हजर होते. सायरस मिस्त्री यांचे मोठे बंधू शापूर मिस्त्री, ज्येष्ठ वकील असलेले सासरे इकबाल छागला, उद्योजक अनिल अंबानी, अजित गुलाबचंद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री मिलिंद देवरा, एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख आदी मान्यवर हजर होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95946 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..