बालवाड्यांचे ‘जीआयएस’ मॅपिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालवाड्यांचे ‘जीआयएस’ मॅपिंग
बालवाड्यांचे ‘जीआयएस’ मॅपिंग

बालवाड्यांचे ‘जीआयएस’ मॅपिंग

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : मुंबई महापालिका क्षेत्रातील बालवाड्यांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून पालिकेकडून आता तंत्रज्ञानाच्या मदतीने बालवाड्यांचे ‘जीआयएस’ मॅपिंग केले जात आहे. महापालिकेने राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मदतीने हा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत ‘जीआयएस’ मॅपिंगचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
महापालिकेकडून जीआयएस मॅपिंग केल्या जाणाऱ्या बालवाडीची सर्व माहिती एकत्रित केली जात आहे. शहरातील बालवाड्यांची स्थिती तसेच संख्या सुधारत आहे. या मॅपिंगमुळे मिळालेली माहिती प्रशासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केले जाणार आहे. त्यानुसार पालिकेकडून शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
‘जीआयएस’ मॅपिंगमुळे पालिकेला ठिकाणानुसार बालवाडीचे डिजिटल मॅपिंग करणे शक्य होईल. त्यामुळे ज्या भागातील लोकसंख्येमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे, पण त्या भागात बालवाडी नाही, तेथे बालवाडी सुरू करता येईल, अशी माहिती पालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांनी सांगितले.
---
आर्थिक तरतूद केली जाणार 
मुंबईत राज्य सरकार संचालितही बालवाड्या चालवल्या जातत. त्यामुळे या बालवाड्यांचाही डेटा एकत्र करण्यात येत आहे. पालिकेला आवश्यकतेनुसार बालवाड्यांची संख्या वाढवता येणार आहे. जीआयएस मॅपिंगच्या मदतीने पायाभूत सुविधा जाणून घेणे शक्य होणार आहे. प्रसंगी त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली जाणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
---
बालवाड्यांची संख्या वाढणार 
पालिकेच्या म्हणण्यानुसार, मुंबईत ९०० बालवाड्या आहेत. गेल्या काही वर्षांत पालिका शाळांच्या दर्जावर काम करते आहे. शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसई, आंतरराष्ट्रीय बोर्डही सुरू करण्यात आला आहे. पालिका शाळांमध्ये यावर्षी सव्वा लाख नवीन विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील पटसंख्या वाढली आहे. मुंबईतील सर्व २४ वॉर्डांमध्ये शाळा असल्या तरी नर्सरी शाळांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अशा आणखी शाळा उघडणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95949 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..