मनसे शहराध्यक्षाचा परभणीमध्ये खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे शहराध्यक्षाचा परभणीमध्ये खून
मनसे शहराध्यक्षाचा परभणीमध्ये खून

मनसे शहराध्यक्षाचा परभणीमध्ये खून

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ६ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा सोमवारी मध्यरात्री किरकोळ वादातून खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आज सायंकाळी विजय मारोतराव जाधव याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

सचिन पाटील हे काही मित्रांसह वसमत रोड परिसरातील शिवरामनगरमध्ये रात्री गप्पा मारत होते. त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून विजय जाधव याच्यासोबत त्यांचा वाद झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. सचिन पाटील यांच्यावर विजय जाधवने धारदार शस्त्राने वार केले. यात सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन पाटील यांचे भाऊ संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय जाधव याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक संदीपान शेळके तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95951 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..