उरणमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर
उरणमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

उरणमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

sakal_logo
By

उरण, ता. ६ (वार्ताहर) : शिवसेनेच्या माध्यमातून नेहमी समाजोपयोगी कार्यक्रम उरणमध्ये राबवले जातात. शिवसेना उरण प्रणित श्री गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी (ता. ६) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेजनक्ष हॉस्पिटलचे डॉ. हंसराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, हिमोग्लोबिन आदी तपासण्या करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली. या वेळी शिवसेना शहरप्रमुख विनोद म्हात्रे, माजी सभापती विश्वास म्हात्रे, माजी नगराध्यक्ष परमानंद करगुकर, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, अल्पसंख्याक सेल विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, शहराध्यक्ष शदाब शेख, नगरसेविका वर्षा पठारे, स्मितल पेडणेकर, सुजाता गायकवाड, श्रद्धा सावंत, वंदना पवार, वीणा तलरेजा उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95958 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..