भिवंडीत विसर्जन मार्गावर कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत विसर्जन मार्गावर कोंडी
भिवंडीत विसर्जन मार्गावर कोंडी

भिवंडीत विसर्जन मार्गावर कोंडी

sakal_logo
By

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : गणेशमूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने पोलिस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत वाहतूक विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेचे भिवंडी ग्रामीण पोलिसांनी पालन न केल्याने भिवंडीत मूर्ती विसर्जनास जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याबाबत नागरिकांत संताप व्यक्त केला जात असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
भिवंडी ग्रामीण पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे भिवंडीकरांना नेहमी वाहतूककोंडीचा सामना करावा लागल्याच्या घटना या पूर्वीदेखील घडल्या आहेत. सोमवारी विसर्जनाच्या दिवशी शहराबाहेरून येणाऱ्या जड, अवजड, मध्यम व हलकी वाहने यांना नियंत्रण करण्याच्या हेतूने ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार वाडा रोड मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आंबाडीनाका येथेच प्रवेश बंद करून त्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग आठ अथवा मुंबई महानगरपालिका पाईपलाईनमार्गे जाण्‍यास मुभा देण्‍यात आली होती. पारोळमार्गे येणारी वाहने कांबामार्गे वसई रोड येथून पुढे जातील, अशा सूचना असताना ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाबाबत नियोजन न केल्याने भिवंडीतील नदीनाका ते शेलार या भागात गर्दी झाली.
नियोजनाअभावी त्रास
भिवंडी शहरातील मूर्ती विसर्जन हे नदीनाका टिळक घाट व शेलार भागातील गणेश घाटावर होत असते. दरवर्षी या दरम्यान बाहेरील वाहतूक नसल्याने हातगाडी, कार, टेम्पो आणि रिक्षा घेऊन आलेल्या गणेशभक्तांना कोणताही त्रास होत नव्हता. पण यंदा जड वाहने शेलार ते नदीनाका मार्गावर आल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी दूर करण्यासाठी निजामपूर ठाण्यातील पोलिसांचा कस लागला. या घटनेने गणेशभक्तांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच विसर्जनाच्या मिरवणुकीत अवजड वाहने घुसवून वाहतूक कोंडी करणाऱ्या बेजबाबदार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गणेशभक्तांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95975 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..