चाकरमानी परतीच्या प्रवासाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकरमानी परतीच्या प्रवासाला
चाकरमानी परतीच्या प्रवासाला

चाकरमानी परतीच्या प्रवासाला

sakal_logo
By

पोलादपूर, ता. ७ (बातमीदार) : गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्याने अनेक चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहे. यासाठी एसटी महामंडळही सज्ज झाले असून प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडल्या आहेत. तरीही सर्व बस भरगच्च होत आहेत. परिणामी, अनेक जण खासगी वाहनांकडे धाव घेत आहे. रस्त्यावरही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी वाहने उभी असल्याचे चित्र पोलादपूर तालुक्यात दिसत आहे.
गणेशोत्सवामध्ये प्रवाशांनी एसटीसह खासगी ट्रॅव्हलला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. त्यातच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा एसटीचा प्रवास विनामूल्य असल्याने वयोवृद्धही गौरी-गणपती सणाला गावी आले आहेत. गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर महाड आगारातून विविध मार्गांवर ६ व ७ सप्टेंबरला १०० पेक्षा अधिक जादा एसटी सोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे इतर एसटी आगारातील बस पोलादपूरसह महाड बस स्थानकातून नोंदणी करत असल्याने प्रवाशांची स्थानकात गर्दी दिसून येत आहे. एसटीप्रमाणेच अनेक प्रवासी खासगी बसकडे जात असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ही वाहने दिसत आहेत. दोन दिवसांत गणेशभक्तांसाठी महाड आगारातून जवळपास १०० पेक्षा अधिक बसेस पुणे, नालासोपारा, पनवेल, ठाणे, बोरिवली आदी भागांत सोडण्यात आल्याची माहिती महाड आगारप्रमुख यांनी दिली. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होवो यासाठी पोलादपूर स्थानकातून सहा जादा बस सोडल्याचे पोलादपूर नियंत्रण कक्षामधून सांगण्यात आले.

वरंध घाट बंदचा परिणाम
महाड तालुक्यातील बिरवाडी खोऱ्यातील नागरिकांना पुण्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या वरंध घाटमार्गे एसटी बस सेवा बंद आहे. परिणामी, नागरिकांना खासगी बसने पदरमोड करत प्रवास करावा लागत आहे.

निर्बंधमुक्तीमुळे प्रवासी संख्येत वाढ
निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाल्याने यावर्षी अनेक गणेशभक्तांनी नातेवाईक, आप्तपरिवारांच्या गावाकडे धाव घेतली होती. राज्यभरातील आगारातून जादा बस कोकणात दाखल झाल्या होत्या. त्याच बसेमधून गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नियमित बसच्या फेऱ्यांप्रमाणे जादा बस व प्रवासी संख्या वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95984 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..