वसई शेतकरी सोसायटीने उघडले ड्रायफ्रूट मार्टचे दालन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई शेतकरी सोसायटीने उघडले ड्रायफ्रूट मार्टचे दालन
वसई शेतकरी सोसायटीने उघडले ड्रायफ्रूट मार्टचे दालन

वसई शेतकरी सोसायटीने उघडले ड्रायफ्रूट मार्टचे दालन

sakal_logo
By

विरार, ता. ७ (बातमीदार) : वसई शेतकरी सोसायटीत आत्तापर्यंत शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, सिमेंट, पत्रे, रंग आणि लोखंड विक्रीसोबत गॅस वितरणामध्ये गेली ८३ वर्षे व्यवसाय करत आहे.
यापुढे जाऊन आता शेतकरी सोसायटीने ड्रायफ्रूट मार्टच्या आऊटलेटच्या एका नवीन दालनाची सुरुवात केली आहे. या नव्या ड्रायफ्रूट दालनाची सुरुवात देवतलाव येथील सोसायटीच्या मुख्यालयाच्या इमारतीत करण्यात आली आहे. या ऑऊटलेटचे उद्घघाटन वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी आणि वसई विकास बँकेचे माजी उपाध्यक्ष जगदीश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अजय खोखणी, सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश चौधरी यांच्यासह सोसायटीचे चेअरमन आशय राऊत, व्हाईस चेअरमन समीर पाटील उपस्थित होते. सोसायटीचे मानद सचिव हरेश्वर राऊत यांनी उपस्थित मान्यवर व इतरांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95990 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..