बॅनरबाजीवरून भाजप–शिवसेनेत संघर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅनरबाजीवरून भाजप–शिवसेनेत संघर्ष
बॅनरबाजीवरून भाजप–शिवसेनेत संघर्ष

बॅनरबाजीवरून भाजप–शिवसेनेत संघर्ष

sakal_logo
By

मालाड, ता. ७ (बातमीदार) ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी मुंबईत चालणारे ‘बॅनर वॉर’ आता शिवसेना-भाजपमध्‍ये सुरू झाले आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या दहीहंडीबाबतचा वाद अजूनही संपलेला नसताना शिवसेनेने एसी मार्केट बस थांबा, ताडदेव येथे नियमांप्रमाणे भाजपने लावलेले गणपती बाप्पाचे बॅनर हटवत त्‍यावर शिवसेनेचे बॅनर लावले. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सांगितले की, ‘आम्‍ही नियमांचे पालन करून आमच्या नेत्यांचे बॅनर्स लावले आहेत. त्यावर शिवसेनेने बळजबरीने बॅनर लावले. असे वर्तन त्‍वरित बंद करावे, अन्यथा युवा मोर्चा आपल्या शैलीत उत्तर देण्यास सक्षम आहे.’
तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. ७) सकाळी मुंबईतील ताडदेव परिसरात, एसी मार्केट बस थांब्यावर पोहचून शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांनी लावलेले बॅनर हटवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95991 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..