सायवन येथे पार पडल्या मॅरेथॉन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायवन येथे पार पडल्या मॅरेथॉन स्पर्धा
सायवन येथे पार पडल्या मॅरेथॉन स्पर्धा

सायवन येथे पार पडल्या मॅरेथॉन स्पर्धा

sakal_logo
By

कासा, ता.७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यामधील सायवन-बाजारपाडा येथे आदिवासी जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेली सायवन मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात पार पाडली. या स्पर्धेमध्ये तलासरी, डहाणू, पालघर, पुणे, दादरा-नगर हवेली आणि नाशिक येथील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. पाच किमीच्या अंतरामध्ये विक्रमगड तालुक्यातील खांड गावातील अमित माळी हा प्रथम आला. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्याला पालघर जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी, पंचायत समिती सदस्य पिंटी बोरसा, तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सायवन हा पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम ग्रामीण भाग असून दरवर्षी गणेशोत्सव निमित्ताने या विविध स्पर्धा घेतले जातात. स्पर्धेचे उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील खेळाडूंना कलागुणांना वाव मिळावा. त्यांना पुढे जाऊन मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नेहमीच या स्तरातून प्रयत्न केले जातात. सायवन गावातील सर्व नोकरदार वर्ग, मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती यांचा मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पाडल्या जातात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95994 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..