हॉटेल चालकाच्‍या अतिक्रमणावर हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटेल चालकाच्‍या अतिक्रमणावर हातोडा
हॉटेल चालकाच्‍या अतिक्रमणावर हातोडा

हॉटेल चालकाच्‍या अतिक्रमणावर हातोडा

sakal_logo
By

खर्डी, ता. ७ (बातमीदार) : मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलच्या मालकाने वन विभागाच्या ४४ गुंठे जागेवर अतिक्रमण करून शौचालयाचे केलेले बांधकाम ७ सप्टेंबर रोजी जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले. तसेच हॉटेलच्या पुढील मोकळ्या जागेत चर खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे. वन विभागाच्या या कारवाईमुळे महामार्गालगत असलेल्या हॉटेल व इतर टपऱ्याधारकांचे धाबे दणाणले असून ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे शहापूरचे उपवनसंरक्षक अमोल जाधव यांनी सांगितले.
खर्डी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजे शिरोळ डेपोतील संरक्षित (वन सर्व्हे नंबर ६०१) लगत जमीन खातेदार (सर्व्हे न.३९८) असलेल्या हॉटेलमालकाने वन विभागाच्या मोकळ्या ४४ गुंठे क्षेत्रावर अनधिकृत अतिक्रमण केले होते. शहापूरचे उपवनसंरक्षक अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक शहापूर, वनपरिक्षेत्र अधिकारी खर्डी, वाशाळा, विहिगाव, फिरते पथक शहापूर, लोकल चेकिंग यांच्यासहित सर्व कर्मचाऱ्यांसह अतिक्रमण हटविण्यात आले असून सदर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या वेळी खर्डीचे वनक्षेत्रपाल चिखले यांच्यासह अनेक वनाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96010 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..