अंबिकाबाई जाधव महिला विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबिकाबाई जाधव महिला विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
अंबिकाबाई जाधव महिला विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

अंबिकाबाई जाधव महिला विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले कोकणचे सुपुत्र पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय समाज उन्नती संस्थेने विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्‍हणून वज्रेश्वरी येथील अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. पत्रकार मिलिंद कांबळे यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. पुस्तकावर प्रेम असेल आणि त्याचे वाचन आणि आचरण झाले तर तुम्हाला आयुष्यात कधीही अपयश येणार नाही, असे या वेळी मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथालयाचे उद्‌घाटन पत्रकार मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्‍यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव कांबळे अध्यक्षस्थानी होते. ज्‍येष्ठ नागरिक सुहास कापसे व कर्मचारी वृंद उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनाचे नियोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल मुंडे यांनी केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96018 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..