तरुणावर शेजाऱ्याचा चाकूने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणावर शेजाऱ्याचा चाकूने हल्ला
तरुणावर शेजाऱ्याचा चाकूने हल्ला

तरुणावर शेजाऱ्याचा चाकूने हल्ला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : खाण्‍यासाठी गुटखा नाही असे शेजाऱ्याने सांगताच संतप्त झालेल्या २२ वर्षीय तरुणाने शेजाऱ्याला मारहाण करीत त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात अजय बोथ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. याच परिसरात जखमी स्वतंत्रसिंग सिंग (वय ३०) हे राहण्यास असून त्यांचा सुतार कामाचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री ९ वाजता ते जेवण झाल्यानंतर घराबाहेर फेऱ्या मारत होते. त्यांच्या ओळखीचा अजय हा तेथे आला व स्वतंत्रसिंग यांच्याकडे गुटखा मागितला. त्यावर सिंग यांनी मी गुटखा खात नाही, माझ्याकडे गुटखा नाही असे त्यास सांगितले. याचा राग आल्याने अजय याने त्याच्याजवळील चाकूने सिंग यांच्यावर हल्ला केला. यामध्ये सिंग हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात हलविले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96024 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..