द्वारका विद्यालयात शिक्षक दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्वारका विद्यालयात शिक्षक दिन
द्वारका विद्यालयात शिक्षक दिन

द्वारका विद्यालयात शिक्षक दिन

sakal_logo
By

कल्‍याण, ता. ७ (बातमीदार) : एसडीएलके एज्युकेशन ट्रस्ट संचालित द्वारका विद्यामंदिर माध्यमिक व बाल विकास मंदिर नांदिवली कल्याण पूर्व या विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. संस्थापक दळवी यांनी उपस्थित पालकांचे स्वागत केले व सर्व शिक्षकांच्या वतीने दळवी यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक व पालकांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी संस्थापक दत्तात्रय दळवी, संचालिका मीरा दळवी, विद्यालयाच्या व्यवस्थापिका सीमा दळवी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा ज्‍येष्ठ शिक्षिका गौरी देवधर, शाळेत कार्यरत असणारे सर्व शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेच्‍या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून अध्यापन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96028 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..