टीडीआर वाटपाची नव्याने चौकशी करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीडीआर वाटपाची नव्याने चौकशी करण्याची मागणी
टीडीआर वाटपाची नव्याने चौकशी करण्याची मागणी

टीडीआर वाटपाची नव्याने चौकशी करण्याची मागणी

sakal_logo
By

कल्याण, ता. ७ (बातमीदार) : संघटित गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील आरक्षित जागेच्या बदल्यात दिलेला संपूर्ण बेकायदेशीर टीडीआर वाटप केल्याबद्दल तत्कालीन पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे, नगररचना विभागामधील अधिकारी च. प्र. सिंह व रघुवीर शेळके यांची बेकायदेशीरपणे केलेली चौकशी रद्दबादल करून नव्याने कायदेशीर चौकशी पुनर्स्थापित करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.
राज्याच्या विधिमंडळामध्ये कल्याणमधील मौजे चिकणघर येथील आरक्षण क्र. १९२ ते १९७ या आरक्षित भूखंडाच्या मोबदल्यात बेकायदेशीरपणे मंजूर करण्यात आलेल्या टीडीआर प्रकरणाची लक्षवेधी विधान परिषदेमध्ये शिवसेना आमदार अनिल परब यांनी २०१५ पासून सातत्याने मांडली असून सविस्तर चर्चेअंती त्यावेळी तत्कालीन केडीएमसी आयुक्त रामानथ सोनवणे, सहायक संचालक नगररचनाकार च. प्र. सिंह, नगरचना विभागामधील रघुवीर शेळके, शशिम केदार आदी अधिकारी वर्गावर शासनाने दोषारोप निश्चित केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96032 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..