अमली पदार्थासह चौकडी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमली पदार्थासह चौकडी गजाआड
अमली पदार्थासह चौकडी गजाआड

अमली पदार्थासह चौकडी गजाआड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ७ : ठाण्यातील मुंब्रा परिसरात अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या चार जणांना गजाआड करण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले. या चार आरोपींमध्ये एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे. आरोपींकडून मुंब्रा पोलिसांना अंगझडतीत ८१ ग्राम एमडी पावडर सापडली. याबाबत अधिक तपास मुंब्रा पोलिस करीत आहेत.
मुंब्रा परिसरात नशाबाजांची संख्या वाढत असल्याची गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलक यांनी संबंधितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. मुंब्रा पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने मुंब्रा येथील दत्तूवाडी पेट्रोल पंप येथे सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून २६ ग्रॅम वजनाचे मोफेड्रीन (एमडी) ड्रग्ज जप्त केले. मिळालेल्या मुद्देमालानंतर पोलिसांनी या तिघांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अकदस सलीम शेख (वय २३), सय्यद नेहाला मोहम्मद हाफरोज (वय २०) आणि मुदस्सीर मोईनोद्दिन खान (वय २२) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या आरोपींची कसून चौकशी केली असता या तिघांनी एका नायजेरियन व्यक्तीकडून हे मोफेड्रीन खरेदी करून विक्री करण्यासाठी आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुंब्रा येथील रेतीबंदर २ गणेश घाट येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५५ ग्राम वजनाचे मोफेड्रीन ड्रग्ज जप्त केले. त्यालादेखील अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाने या आरोपींना ७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96046 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..