अनंत चतुर्दशीला वाशी, सीबीडीत वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनंत चतुर्दशीला वाशी, सीबीडीत वाहतुकीत बदल
अनंत चतुर्दशीला वाशी, सीबीडीत वाहतुकीत बदल

अनंत चतुर्दशीला वाशी, सीबीडीत वाहतुकीत बदल

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाशी तसेच सीबीडीतील वाहतुकींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्यासाठीची नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
अनंत चतुर्दशीला वाशी तसेच परिसरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींचे वाशीतील जागृतेश्वर तलावात विसर्जन केले जाते. यासाठी सेक्टर-१७ मार्गे शिवाजी चौकातून मिरवणुका जात असतात. त्यामुळे वाशीतील शिवाजी चौकात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने अनंत चतुर्दशीला वाशीतील शिवाजी चौकामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच या बदलामुळे इतर वाहनांसाठी ऐरोली कोपरखैरणेकडून वाशी शहरात येण्यासाठी ब्ल्यू डायमंड सिग्नल चौक ते कोपरी सिग्नलवरून पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. तसेच वाशी रेल्वे स्टेशन तसेच वाशी हायवेवरून मुंबई बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी वाशी फ्लाझा हायवे बसस्टॉपवरून पामबीच मार्गे महात्मा फुले चौक, अरेंजा सर्कल, कोपरी सिग्नलवरून मार्ग निश्चित केला आहे; तर बीडीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते दक्षिणेस सेक्टर-१५ कडे जाणारा रोड व सेक्टर-१५ कडून उड्डाणपुलावरून कर्मवीर भाऊराव पाटील चौकाकडे येणारा रोड हा गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी असून इतर वाहनांसाठी दिवाळे जंक्शन ते भाऊराव पाटील रस्ता, रेल्वे स्टेशन सेक्टर-११ मार्गे निश्चित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवला आहे.
------------------------------------
गणपती विसर्जनामुळे विविध ठिकाणच्या मार्गामध्ये काही प्रमाणात बदल केल्याने वाहनचालकांनी त्याची नोंद घ्यावी. तसेच त्यानुसार वाहने चालवून वाहतूक विभागाला सहकार्य करावे.
- पुरुषोत्तम कराड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96054 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..