आत्महत्या केलेल्या मुलीची ओळख पटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या केलेल्या मुलीची ओळख पटली
आत्महत्या केलेल्या मुलीची ओळख पटली

आत्महत्या केलेल्या मुलीची ओळख पटली

sakal_logo
By

पालघर, ता. ७ (बातमीदार) : पालघर रेल्वेस्थानकात मंगळवारी एका मालवाहतूक गाडीखाली आत्महत्या करणाऱ्या तरुणीची ओळख पटली आहे. नलिनी तुकाराम धुंदाळे (२५) असे या तरुणीचे नाव असून ती माहीम वाघूळसार येथे राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एका तरुणीने पालघर रेल्वेस्थानकात ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तीन ओळीच्या चिठ्ठीव्यतिरिक्त अन्य कुठलेही पुरावे हाती नसल्याने पालघर लोहमार्ग पोलिसांपुढे पेच निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांनी सांगितले की, ही तरुणी शेगाव येथील असून ती मुंबईमध्ये आपल्या आजारी आईसोबत काही काळ राहिल्यानंतर माहीम वाघूळसार येथील मेग्नस ओंकारा ए विंगमध्ये राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्या मुलीची आई दुर्धर आजाराने त्रस्त असून तिचे अन्य कुणीही नातेवाईक नसल्याची बाब समोर आली आहे. तिची औरंगाबाद येथील मैत्रीण पालघरकडे रवाना झाली असून तिच्याकडे चौकशीनंतर आत्महत्येचे कारण कळण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96055 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..