पालघरमध्ये १३ ऑक्टोबरला ग्रामपंचायतींची निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये १३ ऑक्टोबरला ग्रामपंचायतींची निवडणूक
पालघरमध्ये १३ ऑक्टोबरला ग्रामपंचायतींची निवडणूक

पालघरमध्ये १३ ऑक्टोबरला ग्रामपंचायतींची निवडणूक

sakal_logo
By

पालघर, ता. ७ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींची निवडणूक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी (ता. ७) जाहीर केला आहे.
पालघर जिल्ह्यातील एकूण ३४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १३ ऑक्टोबरला होतील. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून ६२, विक्रमगड ३६, जव्हार ४७, वसई ११, मोखाडा २२, पालघर ८३, तलासरी ११, वाडा ७० याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख १३ सप्टेंबर, उमेदवारी अर्ज दाखल करणे २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर, उमेदवारी अर्जाची छाननी २८ सप्टेंबर, उमेदवारी मागे घेणे ३० सप्टेंबर व त्याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. १३ ऑक्टोबरला मतदान होणार असून मतमोजणी १४ ऑक्टोबरला होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96060 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..