१२ वर्षीय मुलाचा आकस्मित मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१२ वर्षीय मुलाचा आकस्मित मृत्यू
१२ वर्षीय मुलाचा आकस्मित मृत्यू

१२ वर्षीय मुलाचा आकस्मित मृत्यू

sakal_logo
By

रोहा, ता. ७ (बातमीदार) ः गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आटोपून ग्रामस्थ घरी जात असताना १२ वर्षीय हिमेश प्रफुल्ल धनावडे याचा आकस्मित मृत्यू झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. रोहे तालुक्यातील कोलाडजवळील गोवे गावात ५ दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर ही अप्रिय घटना घडली. मंगळवारी (ता. ६) गौरी-गणपती विसर्जन कार्यक्रम संपल्यानंतर घरातील मंडळींबरोबर हिमेश घरी परतला. रात्रीचा जेवण करून तो झोपी गेला; मात्र रात्री अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्याची तब्येत खालवली असल्याने पहाटे ४ वाजता सुमारास रोह्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्याला घरी नेण्यात आले. काही तासानंतर पुन्हा त्याची तब्येत बिघडली. पुढील उपचारासाठी त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली. हिमेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. सर्पदंश झाला असावा, असा अंदाज ग्रामस्थ वर्गातून व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96073 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..