''ब्लूटूथ'' च्या माध्यमातून टचलेस ओपीडीचा प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''ब्लूटूथ'' च्या माध्यमातून टचलेस ओपीडीचा प्रयोग
''ब्लूटूथ'' च्या माध्यमातून टचलेस ओपीडीचा प्रयोग

''ब्लूटूथ'' च्या माध्यमातून टचलेस ओपीडीचा प्रयोग

sakal_logo
By

‘ब्ल्यूटुथ’च्या माध्यमातून टचलेस ओपीडीचा प्रयोग
ग्रामीण भागातील रुग्णांना होणार फायदा

किरण कारंडे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : कोविड संसर्गाच्या काळात रुग्णांना तपासण्यासाठी तयार करण्यात आलेले ब्ल्यूटुथ स्तेतोस्कोप आता ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. कोरोना काळातील गरज म्हणून निर्माण करण्यात आलेल्या टचलेस ओपीडीचा फायदा कुठेही बसून रुग्ण आणि डॉक्टरचा कनेक्ट घडवण्यासाठी मदतीचा ठरू शकतो. मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयात पथदर्शी म्हणून या ब्ल्यूटुथ स्तेतोस्कोपचा वापर काही रुग्णालयात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्माईल काऊंसिलच्या स्टार्टअप अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्या पुरेशा अंतरावरूनही कोणत्याही संपर्काशिवाय रुग्णाला तपासणे या उपकरणाच्या माध्यमातून शक्य होईल.
उपकरण निर्मात्या कंपनीने गेल्या दोन वर्षांपासून या उपकरणासाठी काम केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून रुग्णाच्या छातीतील ठोके मोजणे शक्य होईल. ब्ल्यूटुथ स्तेतोस्कोप हे ऑसिलेशन मोजून तसेच रेकॉर्ड करून ॲपला पाठवण्याची सुविधा या उपकरणात आहे. त्यामुळे डॉक्टरांना हा डेटा मोबाईल फोनवर उपलब्ध होणे शक्य आहे. परिणामी डॉक्टर आणि रुग्णामध्ये कोणत्याही स्पर्शाशिवाय आजाराचे निदान करणे शक्य आहे. अगदी दोन मीटर ते चार मीटर अंतरावरूनही उपकरण वापरून डॉक्टरला एखाद्या क्युबिकल किंवा आयसोलेटेड ठिकाणी बसून रुग्णांना तपासणे शक्य आहे. भविष्यातील उपयोगासाठी रुग्णाचा डेटाबेस म्हणून हा आवाज रेकॉर्ड करणेही शक्य आहे.
नुकतेच उपकरणात करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर अपग्रेडनुसार आता टेलिमेडिसिनसाठीही या उपकरणाचा वापर करणे शक्य होईल. त्यामध्ये ग्रामीण भागाशी हे उपकरण कनेक्ट करणे शक्य होणार आहे. रुग्ण आपला डेटा उपकरणाच्या माध्यमातून रेकॉर्ड करून शहरातील डॉक्टरला पाठवू शकतात. त्यामुळेच रुग्णाशी संबंधित भविष्यातील रेकॉर्डसाठीही हा डेटा अतिशय उपयुक्त ठरू शकतो.

कोट
कोरोनाच्या काळात पीपीई कीटमधील डॉक्टरांना रुग्णाचा संपर्क आणि संसर्ग टाळता यावा, या उद्देशानेच ब्ल्यूटुथ स्तेतोस्कोपच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. मुंबई महानगरपालिकेच्या स्माईल काऊंसिलने यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आता टेलिमेडिसिनच्या रूपात आम्ही आमचे उत्पादन विकसित करू शकलो. कार्डिऑलॉजी आणि पलमोनोलॉजीसाठी हे उपकरण उपयुक्त ठरेल.

विशेष सिन्हा, मुख्य प्रशासकीय अधिकारी, आयू डिव्हाईसेस

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96076 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..