गणेशभक्तांसाठी पनवेल- चिपळूण विशेष डेमू! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशभक्तांसाठी पनवेल- चिपळूण विशेष डेमू!
गणेशभक्तांसाठी पनवेल- चिपळूण विशेष डेमू!

गणेशभक्तांसाठी पनवेल- चिपळूण विशेष डेमू!

sakal_logo
By

गणेशभक्तांसाठी पनवेल-चिपळूण विशेष डेमू!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : गणपती उत्सव साजरा करून परतीच्या प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान डेमू विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणातून येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक ०१५९७ डेमू पनवेल येथून ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज संध्याकाळी ७.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०१५९८ डेमू चिपळूण येथून ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज दररोज दुपारी १.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे संध्याकाळी ६.३० वाजता पोहोचेल. या दोन्ही डेमू विशेष गाड्यांना रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे आणि खेड स्थानकांवर थांबणार आहेत. या विशेष गाड्या अनारक्षित एक्स्प्रेस भाड्यानुसार चालविण्यात येतील. प्रवासी यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट बुक करू शकतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96077 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..