कशेडी घाटात एसटी-कारची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कशेडी घाटात एसटी-कारची धडक
कशेडी घाटात एसटी-कारची धडक

कशेडी घाटात एसटी-कारची धडक

sakal_logo
By

पोलादपूर, ता. ७ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एसटी बस व कार यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवार (ता. ७) चोळई गावाच्या हद्दीत घडली.
एसटीचे चालक नागेश बबनराव गुरव विठ्ठलवाडी कल्याण ते चिपळूण बस घेऊन कशेडी घाट चढत होते. तेव्हाच संगमेश्वरहून मुंबईला जाणारी कार आणि बस यांच्यात समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले आहेत. सुजित शशिकांत घाग (वय ४७), निशा शशिकांत घाग, सर्वेश सुजित घाग (वय १२), समृद्धी सुजित घाग (वय ३६, सर्व राहणार नायशी, संगमेश्वर) आणि सूरज विलास जंगम (वय २३, रा. काटवली, महाबळेश्वर) यांना दुखापत झाली आहे. घाग कुटुंब ठाण्यात राहते. या अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलिस, कशेडी कॅंपचे पोलिस आदी घटनास्थळी धावले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सुजित घाग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96083 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..