फर्स्टक्लासचा मासिक पास एसी लोकलमध्ये वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फर्स्टक्लासचा मासिक पास एसी लोकलमध्ये वैध
फर्स्टक्लासचा मासिक पास एसी लोकलमध्ये वैध

फर्स्टक्लासचा मासिक पास एसी लोकलमध्ये वैध

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : प्रवाशांच्या विरोधानंतर मध्य रेल्वेवर १० एसी लोकल रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. आता एसी लोकलची लोकप्रियता आणि प्रवासी संख्या वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने साध्या लोकलच्या प्रथम दर्जाचा मासिक पास एसी लोकलच्या मासिक पासमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य रेल्वेने एसी लोकलच्या वाढत्या लोकप्रियतेचे कारण सांगून १९ ऑगस्ट २०२२ पासून १० सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून त्याऐवजी १० एसी लोकल चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत होता. यविरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मध्य रेल्वेला तडकाफडकी १० एसी लोकल रद्द कराव्या लागल्या होत्या; मात्र रेल्वे मंत्रालयाने लोकलची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी कंबर कसली असून, साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीतील मासिक पास आता आता एसी लोकलच्या पासमध्ये रूपांतरित करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिलेली आहे. या संदर्भाचे आदेश सुद्धा रेल्वे बोर्डाने काढलेले आहे.

असे होणार रूपांतर
साध्या लोकलमधील प्रथम श्रेणीतील मासिक पासधारक एसी लोकलचा पास काढण्यासाठी गेल्यास त्याला फरकाचे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर हा पास एसी लोकलचा पासमध्ये रूपांतरित होणार आहे. सध्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मशन सिस्टिमकडून (क्रिस) चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होताच मध्य आणि पश्चिम रेल्वेवर याची अंमलबजावणी होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96088 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..