मिस्त्री यांच्या कारची ईसीएम तपासणी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिस्त्री यांच्या कारची ईसीएम तपासणी होणार
मिस्त्री यांच्या कारची ईसीएम तपासणी होणार

मिस्त्री यांच्या कारची ईसीएम तपासणी होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः दिवंगत उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातग्रस्त कारची इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल यंत्रणा जर्मनीमध्ये तपासणीकरिता पाठवण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल काही दिवसांत मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती मर्सिडीज बेन्झ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली. महागड्या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल ही यंत्रणा असते. ही यंत्रणा ब्रेकफेल किंवा अन्य तांत्रिक दोष उत्पन्न झाल्यास इशारा देते.

ईसीएम तपासणीनंतर अपघात ही तांत्रिक चूक होती की चालकाचा दोष, यावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत हा अहवाल पूर्ण होऊ शकतो. अपघात होताना सायरस मिस्त्री यांच्या कारचा वेग ताशी १३०-१४० प्रतिकिलोमीटर होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र ईसीएम विश्लेषणानंतर या कारची निश्चित गती काय होती, ते सांगता येणे शक्य असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96089 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..