कृत्रिम तलावावर माजी लोकप्रतिनिधींचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृत्रिम तलावावर माजी लोकप्रतिनिधींचा वावर
कृत्रिम तलावावर माजी लोकप्रतिनिधींचा वावर

कृत्रिम तलावावर माजी लोकप्रतिनिधींचा वावर

sakal_logo
By

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : गणेशोत्सवात विसर्जनासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने ३५ लाख रुपये खर्च करून संपूर्ण शहरात एकूण सात कृत्रिम तलाव बांधले आहेत. मात्र, या तलावांवर माजी लोकप्रतिनिधींचा वावर पाहायला मिळत असून, या लोकप्रतिनिधींनी बॅनरबाजी करत पालिकेच्या श्रेयावरच डल्ला मारला आहे.
गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये, विघ्नहर्त्याचे विसर्जन नियोजनपूर्वक व्हावे, या अनुषंगाने कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने बदलापूर शहरात पूर्व व पश्चिमेला मिळून एकूण सात कृत्रिम तलाव बांधले आहेत. ज्यासाठी पालिकेने ३५ लाख रुपये खर्च केले आहेत. तसेच या ठिकाणी पालिकेने स्टेज व काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र असे असताना हे कृत्रिम तलाव आपणच तयार केले असल्याचा आभास काही माजी लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. यासाठी या लोकप्रतिनिधींनी बॅनर, डीटीपी बनवून तलावांबाबत प्रचारच सुरू केला आहे. विसर्जना वेळी या तलावांच्या ठिकाणी माजी लोकप्रतिनिधींचा वावर असतो. पालिकेचे श्रेय लाटण्याचे काम सध्या या लोकप्रतिनिधींकडून केले जात आहे.
------------------------------
कोट
शहरात पालिकेच्या वतीने ३५ लाख रुपये खर्च करून एकूण सात ठिकाणी कृत्रिम तलाव व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. हे सगळे श्रेय फक्त पालिकेचे असून या कामांसाठी पालिकेचे कर्मचारी सतत कार्यशील आहेत.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96100 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..