भाल गावात ‘मराठी शाळा वाचवा’ मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाल गावात ‘मराठी शाळा वाचवा’ मोहीम
भाल गावात ‘मराठी शाळा वाचवा’ मोहीम

भाल गावात ‘मराठी शाळा वाचवा’ मोहीम

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ८ (बातमीदार) : मराठी शाळेची पटसंख्या वारंवार घसरत आहे आणि पालक वर्गाचा मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. हा बदललेला दृष्टिकोन आणि इथे होऊ घातलेल्या इंग्लिश शाळा हे लक्षात घेऊन मराठी शाळा वाचवणे ही काळाची गरज आहे म्हणून या गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्‍सवाला शैक्षणिक रूप देण्‍यात आले आहे. भाल गावात ‘मराठी शाळा वाचवा’ ही मोहीम जीवन माढवी यांनी हाती घेतली आहे. त्यांनी गणपतीच्‍या सजावटीनिमित्त मराठी शाळा वाचवा, गीता संदेश, पसायदान, वेद, पवित्र ग्रंथ, आश्रम व्यवस्था असा देखावा केला आहे. ‘मराठी शाळा वाचवा’ मोहीम संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प मडवी यांचा आहे.
मराठी शाळा वाचवा मोहिमेंतर्गत गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी हार, फुले, मोदक व लाडू न आणता त्याऐवजी पेन, पेन्सिल, वही आणण्याचे आव्हान जीवन मढवी यांनी केले आहे. हे शैक्षणिक साहित्य गणरायाचरणी अर्पण करावे व अर्पण केलेले शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद शाळेतील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना देऊन सहकार्य करण्याचा संकल्प त्‍यांनी हाती घेतला आहे. या पुढेही विविध संघटनेचे पदाधिकारी व मंडळांनी या शैक्षणिक चळवळीत सहभागी होण्याची ग्वाही दिली आहे. मराठी शाळा वाचवा ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आणि येणारा काळ हा मराठी शाळेचा असेल, अशी माहिती जीवन मढवी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96104 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..