कोनगावच्या कुस्तीपटूंना केंद्र सरकारकडून मॅट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोनगावच्या कुस्तीपटूंना केंद्र सरकारकडून मॅट
कोनगावच्या कुस्तीपटूंना केंद्र सरकारकडून मॅट

कोनगावच्या कुस्तीपटूंना केंद्र सरकारकडून मॅट

sakal_logo
By

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय स्तरावर कुस्तीचा वारसा सांगण्याचा विक्रम भिवंडी तालुक्यातील कोन गावातील खेळाडूंनी केला असून प्रो-कुस्तीच्या निमित्ताने या कुस्तीगिरांना लागणारी संपूर्ण मॅट केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून देण्यात आली. त्याचबरोबर लागणाऱ्या साहित्यासाठी अनेक देणगीदारांनी देणग्या दिल्या आहेत. यामधून कुस्तीगिरांसाठी तालीम मंच तयार झाला असून त्याचा उद्‌घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत कोन गावात पार पडला.
कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रा. विनोद पाटील कोनकर यांनी सांगितले, की ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगीर राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. आंतरराष्ट्रीय मॅट ग्रामपंचायत कोनगांव यांनी दिल्याबद्दल आणि साहित्य आणण्यासाठी देणगी देणाऱ्या देणगीदार यांचे कलानिकेतन मंडळ सदैव ऋणी राहील. तसेच भविष्यात ऑलिम्पिकमध्ये जिल्ह्यातील कुस्तीगीर सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे कलानिकेतन व्यायामशाळेतील कुस्तीगीरांचा आम्हा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. कोन ग्रामपंचायत नेहमीच कुस्तीगीरांच्या पाठीशी उभी राहिल, असे मनोगत विद्यमान सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय मॅटचे उद्‍घाटक आणि आंतरराष्ट्रीय रौप्यपदक विजेता पै. प्रणय राजू चौधरी, राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणारा कलानिकेतन व्यायामशाळेचा पै. ओमकार संतोष कराळे, राष्ट्रीय रौप्यपदक विजेता पै. हर्षद प्रवीण चौधरी, कांस्यपदक विजेता पै. हर्ष दीपक ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96105 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..