खतनिर्मितीसह सामाजिक कार्यात अग्रेसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खतनिर्मितीसह सामाजिक कार्यात अग्रेसर
खतनिर्मितीसह सामाजिक कार्यात अग्रेसर

खतनिर्मितीसह सामाजिक कार्यात अग्रेसर

sakal_logo
By

वसई, ता. ८ (बातमीदार) ः आनंद नगर येथील श्रीगणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या १२ वर्षांपासून सार्वजनिक गणशोत्सव साजरा करताना विविध सामाजिक उपक्रमदेखील राबविले आहेत. या मंडळाने निर्माल्यातून खत निर्मितीची संकल्पना अस्तित्वात आणली असून पर्यावरण संवर्धनालादेखील हातभार लावला आहे.
आनंद नगर येथील श्रीगणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नेहमीच लहान मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना स्पर्धेत सहभाग घेता यावा, याकरिता प्रोत्साहन दिले आहे. दरवर्षी या मंडळाकडून नृत्य, चित्रकला स्पर्धा यांसह विविध खेळही गणेशोत्सव काळात घेतले जातात. त्याचबरोबर नेत्र, आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांमुळे याठिकाणी
नेहमीच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच मंडळाने अर्पण केले जाणाऱ्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा उपक्रम राबवत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष रुचिक मेहता यांनी दिली आहे.

कोरोनाकाळात मदतीचा हात
कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले होते. तसेच परगावातून आलेल्या नागरिकांचे हाल झाल्याने मंडळाच्या सदस्यांनी दोन वेळच्या जेवणासोबत अन्य मदतदेखील केली होती. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसह रुग्णांना अनेकदा आजारी पडलेल्यांना मंडळाने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे. जेणेकरून समाजातील रुग्णांना त्वरित सेवा देणे शक्य होणार आहे. तसेच अनाथ मुलांच्या आश्रमांनादेखील जीवनावश्यक वस्तूंची मदत मंडळाच्या माध्यमातून केली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96116 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..