जलवाहिनीसाठी झाडांची कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलवाहिनीसाठी झाडांची कत्तल
जलवाहिनीसाठी झाडांची कत्तल

जलवाहिनीसाठी झाडांची कत्तल

sakal_logo
By

कासा, ता. ८ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवरील कवडास (उन्नयी) बंधाऱ्यातून मुंबई उपनगरांना पाणी देण्यात येणार आहे. यासाठीच्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण यासाठी शेत जमिनीवरील झाडांची विनापरवानगी कत्तल केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सूर्या नदीवरील कवडास (उन्नयी) बंधाऱ्यासाठी कवडास, वेती, वरोती, घोळ, तवा अशा अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यासाठीच्या जलवाहिनी कवडास येथील बंधाऱ्याच्या बाजूला असणाऱ्या भोईर कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनीमधून गेली आहे. पण ही जलवाहिनी टाकताना भोईर कुटुंबीयांची वडिलोपार्जित लागवड केलेली आंबे, भेंडी, साग व इतर झाडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शासकीय यंत्रणेचा वापर करून तोडली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या शेतकऱ्यांना जमिनीचा अल्प मोबदला मिळाला आहे. पण त्यांच्या मालकी जागेमधील लागवड केलेल्या झाडांचा कोणताही मोबदला दिला गेला नसल्याने तहसील प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना झाडांचा मोबदला द्यावा, अशी मागणी आदिवासी एकता परिषदचे विक्रमगड सचिव संतोष लाखन यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96126 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..