देखाव्‍यातून चिमणीचे मानवाला साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देखाव्‍यातून चिमणीचे मानवाला साकडे
देखाव्‍यातून चिमणीचे मानवाला साकडे

देखाव्‍यातून चिमणीचे मानवाला साकडे

sakal_logo
By

वडाळा, ता. ८ (बातमीदार) ः निसर्गाचा होत असलेला ऱ्हास थांबावा यासाठी अनेक मंडळांनी अनेक देखावे व चलतचित्र सादर केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चुनाभट्टी येथील लाखण कुटुंबीयांनी त्यांच्या घरी ‘चिमणी आणि तिचे मनोगत’; अर्थात चिमणीचे मानवाला साकडे यावर देखाव्याचे सादरीकरण केले आहे.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने निसर्गाचा मुख्य घटक असलेले पक्षीदेखील कालबाह्य होऊ लागले आहेत. यामध्‍ये ‘चिमणी’चाही समावेश झाला आहे. पूर्वी एक घास काऊचा व एक घास चिऊचा, असे म्हणून आपल्या बाळाला आजी घास भरवत असे. मात्र त्याच लहान मुलांसाठी चिमणी म्हणजे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक झाले आहे. निसर्गातील मुख्य घटक असलेल्या चिमणीचे महत्त्‍व सर्वांना कळावे यासाठी सायन-चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल चाळ, साई मंदिरजवळ राहणारे गणेश लाखण यांनी राहत्या घरी देखावा साकारला आहे.

पर्यावरणपूरक साधनांचा वापर
चिमणी सध्‍या दिसेनाशी झाली आहे. याचे कारण काय? याचा शोध घेत लाखण कुटुंबीयांनी गेल्या एक महिन्यापासून या विषयावर अभ्यास केला. त्‍यांनी आपल्‍या देखाव्‍यात महत्त्वाचे मुद्दे पर्यावरणपूरक साधनांतून मांडले आहेत. यात कागद, झाडे, कपडा, कलर नैसर्गिक काथ्या, लाकूड या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

मूर्तिकार विकदेश दार्विटकर, ऋषिकेश मिस्त्री यांच्यासह नीलेश लाखण, वेदांती म्हात्रे, भरत उतेकर, गौरव पाटील, वैभव पाटील, यश लाखण, श्रीतेज लाखण, पल्लवी लाखण, जयदित्य बागवे यांच्‍या सहकार्यातून हा देखावा उभा राहिला आहे.

७० वर्षांची परंपरा
लाखण कुटुंबीय ७० वर्षांपासून सामाजिक देखावे सादर करत प्रबोधनाचे काम करत आहेत. यंदाही मोबाईलसाठी उभारल्या जाणाऱ्या टॉवर्समुळे चिमण्या नष्ट होत असल्‍याचे त्‍यांनी या देखाव्‍यात मांडले आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू नये म्हणून चिमणी कशी जगवता येईल, हे सांगण्याचा प्रयत्‍न या कुटुंबीयांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96127 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..