बदलापुरात सफाई कर्मचाऱ्यांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापुरात सफाई कर्मचाऱ्यांची फसवणूक
बदलापुरात सफाई कर्मचाऱ्यांची फसवणूक

बदलापुरात सफाई कर्मचाऱ्यांची फसवणूक

sakal_logo
By

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) ः कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची ठेकेदारांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातील तीस ते चाळीस टक्के रक्कम ठेकेदार स्वतः घेत असल्याचा धक्कादायक खुलासा मनसेने केला आहे. यासंदर्भात सगळे पुरावे आपल्याकडे असून या कर्मचाऱ्यांना मनसे युनियनकडून मनसे स्टाईलने न्याय मिळवून दिला जाईल, असे मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. कोरोना काळात पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण पगार २१,५०० इतका असून भविष्यनिर्वाह निधी, घरभाडे व इतर देय वगळता या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात १६,५०० इतकी रक्कम जमा होते. मात्र या रकमेतून फक्त दरमहा ९ हजार रुपये इतका पगार या कर्मचाऱ्यांना दिला जातो, सात हजार रुपये काढून घेतले जातात, असे कर्मचाऱ्यांनी या वेळी सांगितले. मनसे वेळ आली तर रस्त्यावरदेखील उतरेल, असे मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर व मनसे जिल्हा संघटक उमेश तावडे यांनी सांगितले.
...
मनसेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जर सफाई कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत जर काही मुद्दे उपस्थित होत असतील, तर त्यासंदर्भात पालिका नक्कीच चौकशी करेल. हे कर्मचारी थेट पालिकेशी संबंधित नसून ठेकेदाराच्या अंतर्गत काम करणारे असल्यामुळे त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न हे पालिकेसमोर येत नव्हते; तरी आता या संदर्भात लवकरात लवकर योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी, नगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96141 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..