प्रदूषणमुक्त गणशोत्सवाचा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदूषणमुक्त गणशोत्सवाचा नारा
प्रदूषणमुक्त गणशोत्सवाचा नारा

प्रदूषणमुक्त गणशोत्सवाचा नारा

sakal_logo
By

वसई, ता. ८ ( बातमीदार) ः गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक स्रोत असलेल्या तलावात केले जात होते. मात्र, यंदा नागरिकांनी या संकल्पनेलाच बगल दिली असून वसई-विरार शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळातील १६ हजार ६४२ बाप्पांच्या मूर्तीचे मनोभावे कृत्रिम तलावात विसर्जन करून प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक वातावरणात बाप्पाना निरोप देण्यात आला आहे.
वसई-विरार शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. नऊ प्रभागात असणाऱ्या तलावात मूर्तीचे विसर्जन केले जाते; परंतु हार, फुले यासह अन्य वस्तूंमुळे नैसर्गिक स्रोताला धोका निर्माण होतो. जलप्रदूषण होते म्हणून वसई विरार महापालिकेने यंदा कुत्रिम तलाव, फिरते तलाव, हौदांमध्ये मूर्तीच्या विसर्जनाचे आवाहन केले होते. याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून सार्वजनिक मंडळ, घरगुती बाप्पांची आरासदेखील पर्यावरणपूरक स्वरूपात केली प्लास्टिक, थर्माकॉलचा वापर न करता टाकाऊपासूनटिकावू, जलबचत, महिला सक्षमीकरण, अत्याधुनिक जगतातील इंटरनेटचे दुष्परिणाम, मैदानी खेळ, वृक्षसंवर्धन, प्रदूषणाचा विपरीत परिणाम, स्वच्छता, सामाजिक स्वास्थ यासह विविध विषयांवर कलाकृतीतून भाष्य करण्यात आले आहे.
-----------------------
कृत्रिम तलाव विसर्जन सार्वजनिक - घरगुती -
दीड दिवस -८२ - ८४३३
पाच दिवस - २६६ - ४५५८
सात दिवस - ६५ - ३२३८
----------------------
प्रतिक्रिया : -
वसई-विरार महापालिकेने प्रत्येक प्रभागात असलेल्या नैसर्गिक तलावाजवळ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. याकरिता गणेशोत्सवापूर्वी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने विसर्जन उत्साहात पार पडत आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96147 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..