सोडेबारा लाखांची खंडणी उकळणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोडेबारा लाखांची खंडणी उकळणारा अटकेत
सोडेबारा लाखांची खंडणी उकळणारा अटकेत

सोडेबारा लाखांची खंडणी उकळणारा अटकेत

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : सोशल मीडियावर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून खारघरमधील विवाहितेकडून तब्बल १२ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम उकळणाऱ्या खंडणीखोराला खारघर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमधून अटक केली. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
नवीन श्यामदेव कश्यप (वय २४) असे या खंडणीखोराचे नाव असून मागील काही महिन्यांपासून हा आरोपी विवाहितेला त्रास देत होता. या घटनेतील २५ वर्षीय विवाहिता खारघमध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहण्यास आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये या विवाहितेची मीनाक्षी नामक महिलेसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोघींनी आपले फोटो एकमेकींना दिले होते. मीनाक्षीने या विवाहितेचे अश्लिल फोटो तिचे मित्र सचिन मीना व नवीन कश्यप या दोघांना पाठवून दिले. त्यानंतर सचिन आणि नवीन या दोघांनी या विवाहितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. काही महिन्यापूर्वी आरोपी नवीन कश्यप खारघर येथे या विवाहितेला भेटण्यासाठी आला होता. नशेचे पेय पाजून तिच्यासोबत अश्लील चाळे करतानाचे फोटो काढून घेतले होते. त्या फोटोंचा वापर करून तो विवाहितेला घाबरवत होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96156 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..