पालिकेने पाणी गळती थांबवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेने पाणी गळती थांबवली
पालिकेने पाणी गळती थांबवली

पालिकेने पाणी गळती थांबवली

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः रमाबाई आंबेडकर नगरात अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटून पाणीगळती सुरू असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसारित केले. पाणी गळती न थांबल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घाटकोपर तालुका कार्याध्यक्ष डी. जे. गांगुर्डे यांनी बातमीच्या माध्यमातून दिला होता. त्‍याची एन वार्ड सहायक आयुक्त संजय सोनवणे यांनी दखल घेत गणेश विसर्जनापूर्वीच ही पाणी गळती थांबवली आहे.
डी. बी. पवार चौक ते चार चाळ रोड, अर्चना स्टोअर या भागात गेल्या दोन वर्षांपासून जलवाहिन्या फुटून त्यातून पाणी गळती सुरू होती. या संदर्भात गांगुर्डे यांनी सतत पालिकेला निवेदन देत अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, मात्र यावर कोणताच उपाय निघत नसल्याने अखेर ‘सकाळ’ने हे वृत्त प्रसारित केले. या वृत्तातून उग्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला. याबाबत आज सहायक आयुक्त संजय सोनवणे यांनी कायमचा तोडगा शोधत दोन वर्षांपासून सतत होणारी पाणी गळती रोखली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96165 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..