अंगणवाडी सेविका वीज पडून जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविका वीज पडून जखमी
अंगणवाडी सेविका वीज पडून जखमी

अंगणवाडी सेविका वीज पडून जखमी

sakal_logo
By

कासा, ता. ८ (बातमीदार) ः ऑनलाईन डाटा अपलोड करण्यासाठी उंच टेकडीवर गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या अंगावर वीज पडून ती गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना डहाणूमध्ये घडली. ललिता गोरवाला (वय ४८) असे या जखमी अंगणवाडी सेविकेचे नाव असून त्या डहाणूतील ओसरविरा पाटील पाडा येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. मात्र दररोजचा डाटा अपलोड करण्यासाठी नेटवर्क नसल्याने त्या नेटवर्कच्या शोधात एका टेकडीवर गेल्या असता त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याबरोबर आवरपाडा येथील अंगणवाडी सेविका अनुसया कोरडा यासुद्धा होत्या. त्यांनाही विजेचा धक्का बसला आहे. याच वेळी काही अंतरावर एका बैलावर वीज पडून बैल मृत्युमुखी पडला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96182 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..