वृद्धेच्या हत्येप्रकरणी मायलेकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्धेच्या हत्येप्रकरणी मायलेकास अटक
वृद्धेच्या हत्येप्रकरणी मायलेकास अटक

वृद्धेच्या हत्येप्रकरणी मायलेकास अटक

sakal_logo
By

ठाणे, ता. ८ ः ६५ वर्षीय वृद्धेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या माय-लेकाला अवघ्या १२ तासांत श्रीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही आरोपी या वृद्ध महिलेचे शेजारी होते. वृद्ध महिला काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होती. पण तिच्याच घरातून उग्र वास आल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. दरम्यान, कोणताही ठोस पुरावा नसताना यशस्वी तपास करून या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल पोलिस उपायुक्त विनय राठोड यांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना १५ हजारांचे रिवॉर्ड दिले आहे. हत्या झालेल्या वृद्धेचे नाव जिजाबाई केदार असून त्या वागळे इस्टेटमधील संजय गांधीनगर येथे राहत होत्या. शेजारी राहणाऱ्या नारायण विजयलाल केवट (वय २७) संशयाच्या भोवऱ्यात सापडला. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची आई सुभावती केवट (वय ४७) हिलाही गुन्ह्यात सहभाग आढळल्याने अटक केली. तपास करणाऱ्या सुनील धोंडे, मुकुंद राठोड, नीलेश शेंडगे यांना सन्मानित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96184 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..