Ganesh Visarjan 2022 : विसर्जन मिरवणुकीवेळी १३ पुलांवर पोलिस बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Ganesh visarjan 2022
विसर्जन मिरवणुकीवेळी १३ पुलांवर पोलिस बंदोबस्त

Ganesh Visarjan 2022 : विसर्जन मिरवणुकीवेळी १३ पुलांवर पोलिस बंदोबस्त

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील धोकादायक असलेल्या १३ पुलांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी पुलावर येणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मनाई केली जाणार आहे. तसेच याबाबत पोलिसांनी खबरदारी घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबई महापालिकेने गणेशोत्सव समन्वय मंडळांसोबत झालेल्या बैठकीत १३ धोकादायक पुलांचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावेळी या पुलांवरून विसर्जन मिरवणूक नेण्यास किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना नाचण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अनंत चतुर्दशीला या धोकादायक पुलांवर पोलिस बंदोबस्त राहील, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.

पालिकेचे आदेश
- गणेश विसर्जनावेळी या पुलांवर गर्दी करू नये.
- ध्वनिक्षेपकाचा वापर किंवा नाचगाण्याचे प्रकार टाळावेत.
- पुलावर अधिक वेळ न थांबता त्वरित पुढे जावे.

धोकादायक पूल कोणते?
घाटकोपर रेल्वे ओव्हरब्रिज, करी रोड रेल्वे ओव्हरब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल्वे ओव्हरब्रिज, भायखळा रेल्वे ओव्हरब्रिज, मरीन लाईन्स रेल्वे ओव्हरब्रिज, फॉकलॅंड रेल्वे ओव्हरब्रिज, बेलासिस पूल, महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हरब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल्वे ओव्हरब्रिज, दादर टिळक रेल्वे ओव्हरब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हरब्रिज, फ्रेंच रेल्वे ओव्हरब्रिज आणि केनडी रेल्वे ओव्हरब्रिज.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96185 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..