बापाच्या चरणी पुस्तकांचा संच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापाच्या चरणी पुस्तकांचा संच
बापाच्या चरणी पुस्तकांचा संच

बापाच्या चरणी पुस्तकांचा संच

sakal_logo
By

शिवडी, ता. ८ (बातमीदार) ः वाचनाचे महत्त्‍व तळागाळातील प्रत्येक नागरिकाला ज्ञात व्हावे व समाजात वाचन संस्कृती टिकून राहावी, यासाठी दादर पूर्व येथील राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ग्रंथालयाचा देखावा साकारण्यात आला आहे. भाविकांचा या संकल्पनेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांनी पुस्‍तकांचा संच बाप्पाच्या चरणी अर्पण केला आहे.
दादर पूर्व येथील राधेकृष्णा निवास कॉ.ऑ.हॉ. सोसायटी अंतर्गत राधाकृष्णा निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १९७४ मध्ये स्थापन करण्यात आले. मंडळाने पहिल्याच वर्षी राधाकृष्ण विघ्नहर्ता या नावाने गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. दरवर्षी समाजातील ज्वलंत विषय घेऊन ते देखाव्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचे कार्य मंडळ करीत आहे. यंदाही पर्यावरणस्नेही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ग्रंथालय या संकल्पनेवर आधारित सजावट गणपती बाप्पाभोवती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सजावटीमध्ये मंडळाने वापरलेली पुस्तके ही मंडळाला वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक व वाचक यांच्याकडून स्वखुशीने भेट स्वरूपात मिळालेली आहेत. मंडळाकडे जमा झालेली पुस्तके गणेशोत्सवानंतर ‘बुक शेअर इंडिया’ या सेवाभावी संस्थेला मंडळ सुपूर्द करणार आहे. ही संकल्पना ऋषीकेश बाणावलकर, सजावट सुश्मिता चंद्रमौली कॅलिग्राफी सोनाली माने आणि प्रकाशयोजना उमेश काटे व अक्षय यांनी केली असल्याचे राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष अभय चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96191 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..