समता परिषदेतर्फे सत्यशोधकांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समता परिषदेतर्फे  सत्यशोधकांचा गौरव
समता परिषदेतर्फे सत्यशोधकांचा गौरव

समता परिषदेतर्फे सत्यशोधकांचा गौरव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : महात्मा जोतिराव फुलेंनी १८७३ मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला २२ सप्टेंबर २०२२ ला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे सत्यशोधक समाजामध्ये कार्यरत समाजसेवकांचा गौरव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे योजिले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये २६ सप्टेंबरला दुपारी साडेबाराला हा कार्यक्रम होईल. यात कमल विचारे, बाबा आढाव, आ. ह. साळुंके, प्रा. रावसाहेब कसबे, भारत पाटणकर, दिवंगत डॉ. गेल ऑमव्हेट, उत्तम कांबळे, प्रा. हरी नरके आदींच्या कार्याचा गौरव करण्यात येईल.

समता परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी समीर भुजबळ, पंकज भुजबळ, बापू भुजबळ, प्रा. नरके, शिवाजीराव नलावडे, रवींद्र पवार, सदानंद मंडलिक, प्रा. दिवाकर गमे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, ॲड. सुभाष राऊत, मंजिरी धाडगे, प्रा. कविता म्हेत्रे, प्रीतेश गवळी, अंबादास गारूडकर, डॉ. डी. एन. महाजन, डॉ. नागेश गवळी, राजेंद्र नेवसे, किरण झोडगे, कैलास मुदलियार, समाधान जेजुरकर, ज्ञानेश्वर दराडे, संतोष वीरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या आठवणींना उजाळा देण्याच्या दृष्टीने सन्मान सोहळ्यात संवाद होणार आहे. शिवाय सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राज्यभर वर्षभर विविध कार्यक्रम होतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96202 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..