मालाड पूर्वेत इमारतीची लोखंडी मचाण पडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाड पूर्वेत इमारतीची लोखंडी मचाण पडली
मालाड पूर्वेत इमारतीची लोखंडी मचाण पडली

मालाड पूर्वेत इमारतीची लोखंडी मचाण पडली

sakal_logo
By

मालाडमध्ये २३ माळ्याची
लोखंडी परांची कोसळली
मालाड, ता. ८ (बातमीदार) ः मालाड पूर्वेतील अप्पा पाडा परिसरात नवीन एसआरएच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना २३ मजल्यांची लोखंडी परांची आज सायंकाळी कोसळली. दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
शेजारी असलेल्या मंगलकृपा इमारतीवर मचाण कोसळल्याने काही काळ घबराट पसरली होती. परांची कोसळल्याने संरक्षण भिंत पूर्णपणे तुटून पडली. घटनेच्या वेळी कोणी नसल्याने जीवित हानी टळली; परंतु २० ते २५ दुचाकींचे व इतर साहित्याचे नुकसान झाले. घटनेनंतर पोलिस, अग्निशमन दल आणि पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96208 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..