मुरबाड शहरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड शहरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाला
मुरबाड शहरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाला

मुरबाड शहरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाला

sakal_logo
By

मुरबाड, ता. १० (बातमीदार) : शहरात गुरुवारी रात्री दहा वाजता वीज पडल्याने इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर जळून गेला. यामुळे सोनार आळी भागात अंधार पसरला, तर ग्रामपंचायत व्यापारी संकुलामधील एका गाळ्यात असलेल्या इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या मशीनही जळून खाक झाल्या. अचानक वीज पडल्‍याने ‍गणेश नगर भागात पंखे, विद्युत उपकरणांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्‍याची माहिती ज्‍येष्ठ नागरिक सुरेश हिंदुराव यांनी दिली.
मुरबाड शहरात रात्री दहा वाजता वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री दोन वाजेपर्यंत अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला; मात्र, ट्रान्सफॉर्मर जळाल्याने बाजारपेठ, सोनार आळी भागातील विद्युत पुरवठा जवळपास वीस तास बंद होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96213 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..