फिरते आरोग्य केंद्र आदिवासी पाड्यांसाठी वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिरते आरोग्य केंद्र आदिवासी पाड्यांसाठी वरदान
फिरते आरोग्य केंद्र आदिवासी पाड्यांसाठी वरदान

फिरते आरोग्य केंद्र आदिवासी पाड्यांसाठी वरदान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : शहराचे झपाट्याने होणारे नागरीकरण, त्या तुलनेत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा तोकड्या पडत आहेत. दुसरीकडे ठाण्याच्या शहरी भागाला लागून असलेल्या अनेक आदिवासी पाड्यांवर पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. आता येथील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील २० आदिवासी पाड्यांमध्ये फिरते आरोग्य केंद्र सुरू केले असून, आतापर्यंत २३५ रुग्णांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ठाण्यातील आदिवासी पाड्यांवर फिरत्‍या आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्य सुविधा पुरविण्याचा निर्णय पालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला. याचा शुभांरभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २६ ऑगस्ट रोजी करण्यात आला. या वेळी येऊर आणि ठाणे शहरातील २० आदिवासी पाड्यांवर दोन हजार ९८८ घरे असून येथील लोकसंख्या १२ हजार ९४९ इतकी आहे. याठिकाणी पालिकेचे फिरते आरोग्य केंद्र सध्या सुरू झाले आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सात दिवसांत २३५ रुग्णांनी याठिकाणी जाऊन तपासणी केली आहे. तसेच त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्‍यात आली. चार गर्भवती मातांची तपासणीदेखील या केंद्रावर करण्यात आली आहे. या केंद्रात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये सर्दी, तापाचे ३७, उलटी जुलाब ३७, श्वासाचे आजार ४२, नाक, कान, घसा विकाराचे ३०, त्वचेचे आजार ३७ अशा काही रुग्णांचा समावेश आहे. या फिरत्या आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी, गर्भवती मातांची तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, जखम झाली असल्यास मलमपट्टी करणे, सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार करणे तसेच इतर आरोग्य तपासण्या आणि उपचाराची सुविधा फिरत्‍या आरोग्य केंद्राद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे फिरते आरोग्य केंद्र आदिवासी पाड्यांसाठी वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे.
.................
आदिवासी पाडे - रुग्ण
दिवा - १३६
सोनाचा पाडा - ०५
भेंडीपाडा - १६
नारळीपाडा - ०९
आश्रम परिसर - ०८
पाटीलपाडा - ०९
...........
कोट
फिरत्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील नागरिकांना तत्काळ उपचार मिळावेत, हाच या मागचा उद्देश असून पालिकेच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96216 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..