नादुरुस्त पादचारी पुलाची दुरुस्ती वर्गणीतुन करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नादुरुस्त पादचारी पुलाची दुरुस्ती वर्गणीतुन करू
नादुरुस्त पादचारी पुलाची दुरुस्ती वर्गणीतुन करू

नादुरुस्त पादचारी पुलाची दुरुस्ती वर्गणीतुन करू

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) : अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पादचारी पुलाची दुरवस्था झाली आहे. वारंवार निवेदने, चर्चा करूनही पुलाच्‍या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने परवानगी दिल्‍यास शहरातील व्यापारी बांधव लोकवर्गणीतून पुलाची दुरुस्ती करतील, अशी मागणी अंबरनाथ व्यापारी संघाने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पश्चिमेकडे जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावर जाणाऱ्या पायऱ्यांवरील टाईल्स उखडल्‍या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पायऱ्या चढताना व उतरताना, तसेच पुलावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. याबाबत रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांनी पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पावसाळ्यात पायऱ्यांवर पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. पुलाच्या दुरुस्तीबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता पूल नगरपरिषदेच्या ताब्यात आहे, नगरपालिकेने दुरुस्ती करावी, असे सांगण्यात येते; तर रेल्वे पुलाबाबत नगरपालिकेकडे हक्क दिले नसल्याचे व्यापारी संघटनेतर्फे सांगण्यात आले. अखेरीस अंबरनाथ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजीभाई धल आणि सचिव युसूफ शेख यांनी पुलाच्या दुरुस्तीबाबत नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. रेल्वे आणि नगरपालिका प्रशासन यांच्यामार्फत पुलाची दुरुस्ती होऊ शकत नसेल, तर व्यापारी संघटना लोकवर्गणीतून पुलाची दुरुस्ती करेल, अशी मागणी नगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्‍यात आली आहे.
कोट
संबंधित पादचारी पुलाची मालकी रेल्वेने नगरपालिका प्रशासनाकडे कायमस्वरूपी सुपूर्द करावी. पुलाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यास नगरपालिका प्रशासन सक्षम आहे.
- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96218 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..