पालघर जिल्ह्यात राहुरी पॅटर्न राबवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्यात राहुरी पॅटर्न राबवणार
पालघर जिल्ह्यात राहुरी पॅटर्न राबवणार

पालघर जिल्ह्यात राहुरी पॅटर्न राबवणार

sakal_logo
By

मनोर, ता. ११ (बातमीदार) : शेतकऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील राहुरी पॅटर्न पालघर जिल्ह्यात राबवणार असल्याचे अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक अजित घोसाळकर यांनी सांगितले. सोसायटीच्या कार्यालयाचे उद्‍घाटन नुकतेच खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मनोरलगतच्या टेन गावात सोसायटीचे कार्यालय उभारण्यात आले आहे. यावेळी खादी ग्रामोद्योग अधिकारी शिशुपाल सिंग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पंजाबराव चव्हाण, कृषी अधिकारी प्रमोद मांगात, मनोर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप कसबे, सोसायटीचे चेअरमन दिलीप गोवारी व मॅन्युअल गोन्सालविस, वसई-विरार पालिकेचे वैद्यकीय अधिकारी सचिन पांडे आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना अजंता ॲग्रो सोसायटीतर्फे किटचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96233 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..