मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची सुटका
मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची सुटका

मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची सुटका

sakal_logo
By

किन्हवली, ता. १० (बातमीदार) : मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या अजगराला वाचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत वन कर्मचारी व सर्पमित्रांना पाचारण केले. सुमारे दोन तास चाललेल्या बचाव अभियानात कुठलीही शारीरिक इजा न करता अजगराची सुखरूप सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

शहापूर तालुक्यातील दोऱ्याचापाडा (हिव) येथील एका शेतातील पाण्याच्या प्रवाहात मासेमारीसाठी जाळे लावण्यात आले होते. त्यात अडकलेल्या साधारण आठ फुटांचा अजगर जातीच्या सापाला वाचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. आज (ता. १०) सकाळी नऊ वाजता वनकर्मचारी व सर्पमित्र प्रशांत शिराळ आणि जयेश किरपण यांना पाचारण केले. अजगराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी धसई वन परिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव अभियानात नडगाव परिमंडळातील वनपाल रामचंद्र वाघ, वनरक्षक उमाकांत आव्हाड, जिजा ठाकरे, विद्या फर्डे, वनमजूर अशोक भोईर, मधुकर आरे आणि वाहनचालक गणेश शिंगोळे आदींनी मेहनत घेतली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर मासेमारी जाळ्यात अडकलेल्या अजगराला बाहेर काढून त्याची तपासणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96239 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..