गणरायाला जड अंतःकरणाने निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाला जड अंतःकरणाने निरोप
गणरायाला जड अंतःकरणाने निरोप

गणरायाला जड अंतःकरणाने निरोप

sakal_logo
By

किन्हवली, ता. १० (बातमीदार) : भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्‍या गजरात बाप्पांना जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. यंदा गणरायाचे आगमन झाल्यापासून दररोज सायंकाळी काही काळ मुसळधार पाऊस पडत असल्याने विसर्जनासाठी नदी, नाले, ओहोळात पुरेसे वाहते पाणी असल्याने गणेशभक्तांनी आनंद व्यक्त केला. भाकरीवाडी ओहोळावर झालेल्या नवीन गणेशघाटावर ग्रामपंचायतीने गणेशभक्तांच्या स्वागताचे फलक लावून परिसराची स्वच्छता केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96240 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..