दुसऱ्या दिवशीही सार्वजनिक मुर्त्यां विसर्जनाच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या दिवशीही सार्वजनिक मुर्त्यां विसर्जनाच्या प्रतीक्षेत
दुसऱ्या दिवशीही सार्वजनिक मुर्त्यां विसर्जनाच्या प्रतीक्षेत

दुसऱ्या दिवशीही सार्वजनिक मुर्त्यां विसर्जनाच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

दुसऱ्या दिवशीही सार्वजनिक मूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत


मालाड, ता. १० (बातमीदार) ः यंदा अनंत चतुर्दशीलाच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्त्यांचे विसर्जन करताना भाविकांची तारांबळ उडाली; तरीही गणेशभक्त निराश न होता जल्लोष करत बाप्पाला निरोप देण्यासाठी बाहेर पडले होते. विसर्जनासाठी महानगरपालिकेतर्फे कृत्रिम तलावांची निर्मिती करत घरघुती गणपतींच्या विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली होती; मात्र पालिकेच्या जनजागृतीअभावी पर्यावरणसंवर्धन व कृत्रिम तलावाबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचली नसल्याने मालवणीतील कृत्रिम तलावात विसर्जनाची संख्या नाममात्र होती.
शुक्रवारी (ता. ९) रात्री ८ वाजेपर्यंत फक्त २३ मूर्तीचे विसर्जन झाले होते. तसेच मार्वे समुद्रात विसर्जनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विसर्जनाला सुरुवात झाली होती; मात्र दिवस उलटला, तरी जवळपास ३५ ते ४० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत होत्या. तसेच समुद्रात आहोटीमुळे मोठ्या मूर्तींना बोटीच्या सहाय्याने विसर्जन करावे लागत होते. बोटींची मूर्ती नेण्याची क्षमता कमी असल्याने विसर्जनाला विलंब होत होता. त्यामुळे मार्वे समुद्रकिनाऱ्यापासून ते टी जंक्शनपर्यंत सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची विसर्जनासाठी भली मोठी रांग लागली होती.

बेस्टची रूट क्रमांक २७२ ची बस मालाड ते मार्वेपर्यंत जाते; मात्र शनिवारी सकाळपर्यंत विसर्जन सुरू असल्याने ही बस मालवणी चर्च येथून परत मालाडला जात होती. त्यामुळे चाकरमान्यांना मालवणी चर्च ते मार्वेपर्यंत एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96243 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..