आदिवासी महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल
आदिवासी महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल

आदिवासी महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल

sakal_logo
By

वसई, ता. १० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात डोंगराळ भाग आहे. याठिकाणी बांबूची लागवड अधिक आहे, यातून उत्पन्न मिळावे यासाठी आता आदिवासी महिला घराबाहेर पडल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण घेत त्यांनी उद्योजकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
पालघर जिल्हा आदिवासीबहुल क्षेत्र असून, भातशेतीवर अबलंबून आहे. तसेच अन्य रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होण्याचे प्रमाणही वाढत आहे; परंतु हे स्थलांतर रोखता यावे व रोजगार निर्मिती व्हावी म्हणून गेल्या काही वर्षांपासून ‘सेवा विवेक’ या सामाजिक संस्थेने गरजू महिलांना मोफत बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण सुरू केले आहे. बांबूपासून विविध प्रकारचे आकाश कंदील, राखी, पेन होल्डर, मोबाईल होल्डर, फिंगर जॉइंट ट्रे, नवरात्रोत्सवासाठी लागणारे साहित्य असे एकूण ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक व नक्षीदार वस्तू तयार होत असून उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे ग्राहकांकडून मागणी येत आहे. सद्यस्थितीत ३० दिवसांचे प्रशिक्षण हे दहिसर व धुकटन दांडेकर पाडा येथे सुरू करण्यात आले आहे. यात एकूण ७० महिलांनी सहभाग घेतला आहे. या शिबिराचे उद्‌घाटन हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक रमेश पतंगे, सरपंच प्रसाद भोईर, शिक्षक दशरथ केणी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर यांच्या उपस्थितीत झाले. ग्रामपातळीवर बांबू ग्रामोद्योग उत्पादनाच्या माध्यमातून कुशल प्रशिक्षक हे महिलांना प्रशिक्षण देत आहेत. शेकडो महिला आजतागायत विविध वस्तू बाजारपेठेत उपलब्ध करून कमाई करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल. एकीकडे हवामानामुळे वातावरणात होणाऱ्या परिणामाने भातशेतीवर संकट येत असते. त्यातच स्थलांतरित होऊन रोजगार मिळेल याची शाश्वती नसते. अशातच महिला उद्योगाकडे वळत अर्थार्जन कसे वाढेल याकडे लक्ष देत असल्याने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम, अतिदुर्गम भागातील महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे दिसून येत आहे.
----------------
...तर जिल्ह्याला ओळख मिळेल
महिला घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लावत असून त्यांना सन्मानजनक रोजगार मिळत आहेत. तसेच पर्यावरणपूरक वस्तू असल्याने कुठेही निसर्गाला हानी नाही. आदिवासी महिलांना दर्जेदार उत्पादन विक्री करण्यासाठी जर प्रत्येकाने हातभार लावला तर या उद्योगातून पालघर जिल्ह्याला नवी ओळख मिळेल, हे निश्चित.
-----------------
फोटो : बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण घेताना आदिवासी महिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96244 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..