चोरी प्रकरणात दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी प्रकरणात दोघांना अटक
चोरी प्रकरणात दोघांना अटक

चोरी प्रकरणात दोघांना अटक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर): तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सन्नी उर्फ डाकू विकास तरे (२५) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. या दोघांनी नवी मुंबईच्या विविध भागांतून ४ मोटरसायकल व ६ मोबाईल फोन चोरल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.
तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात वाहन चोरीला गेल्याची तक्रार २ सफ्टेंबर रोजी दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोपरखैरणे सेक्टर-१९ मधून आरोपी सन्नी उर्फ डाकू विकास तरे (२५) याला, तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले होते. या दोघांची चौकशी केली असता तुर्भे भागातून मोटरसायकलची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच कोपरखैरणे, नेरूळ आणि खारघर या भागातून ३ मोटरसायकल व ६ मोबाईल फोन चोरल्याचे त्यांनी कबूल केले आहे. पोलिसांनी या आरोपीकडून ४ मोटरसायकल व ६ मोबाईल असा सव्वा चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96264 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..